Search This Blog

Tuesday 2 October 2012

Chanchanmarathikavita: तो एक बाप असतो...........!!!!!!!!!

Chanchanmarathikavita: तो एक बाप असतो...........!!!!!!!!!: शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो, कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो, आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो, डोळा चुकवून बापाचा...

Friday 16 December 2011

तो एक बाप असतो...........!!!!!!!!!

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

आई म्हणजे आई असते !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!


आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

तिची हक़ म्हणजे
मन हराव्नरी असते......
तिची प्रेमळ बोली
मनाला जिंकणारी असते.....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

घरातली तुलस तिच्या
मायेने वाढत असते....
बगिच्यातला निशिगंधा....
तिच्या हसण्याने फुलत असते....
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

तिच्या सुरांवर
घर रमत असते.......
तिच्या तलवार
घर चालत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते.....

आपल्या बलाचे आश्रू पुसयला
ती सतत तयार असते....
आपल्या बलाला सुखाचे क्षण मिलावे.......
म्हणुन ती सतत तलमलत असते...
आई म्हणजे आई असते
जगा वेगळी बाई असते

Tuesday 13 December 2011

सुखा मागे धावता धावता ...............!!!!!

सुखा मागे धावता धावता विवेक पडतो गहाण,
पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान.
स्वप्न सत्यात आनता आनता दमछाक होते खुप ,
वाटी वाटीन ओतले तरी कमीच पडत तुप .

बायका आणि पोरंसाठी चाले म्हणे हा खेळ,
पैसा आणून ओतेन पण मागु नका वेळ.
करियर होत जीवन मात्र जगायच तंत्र ,
बापाची ओळख मुले सांगती पैसा छापयाच यंत्र.


चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुना स्वताहच्याच घरी ,
दोन दिवस कौतुक होत नंतर डोकेदुखी सारी.
मुलच मग विचारू लागतात बाबा अजुन का हो घरी ?
त्यांचाही दोष नसतो त्याना सवयच नसते मुळी.

क्षणिक औदासीन्य येत ,मात्र पुन्हा सुरु होत चक्र ,
करियर करियर दलन दलता स्वास्थ्य होते वक्र .
सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सारवलेल्या .

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागत काही
घालान्याच्या हट्टापाई श्वासाच मुळी घेतला नाही .
सगळ कही पाहता पाहता आरशात पाहन राहून गेल ,
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेल .

कवी : गणेश कदम

मनातले रुप माझे..............!!!!!!

मी तर मी नाहीच
मनातले रुप माझे
कधी कधी तू स्मरताना
ओली पापणी करतोस का
नभाचे पाऊल वाकडे
कधी अंगणी पडते का

उद्याचे स्वप्न बापुडे
कधी आपले म्हणतोस का
गीत माझे स्मरताना
भास जवळी घेतोस का


मी तर मी नाहीच
तूला कधी मी दिसते का
गतकाळाच्या जिर्ण सावल्यां
कधी कुशीत तू भरतोस का

पाऊस वेडा सांगुन जातो
सरीसरीतुन भिजताना
तूला असेच होते कारे
पावसाचे मन जळताना

चिंब झाले मी राधा
नभी सावळा दिसला रे
तूझ्या सावलीचे भास सारे
तू ढगातून हसला ना


कवी : गणेश कदम.

अस्थाला जाणारा सूर्य.......!!!

अस्थाला जाणारा सूर्य
निसर्गाची होणारी घुसमट,
आज एक संकेत देत आहे .....
रात्र हि वैर्याची आहे...............

गावाबाहेरची पडकी विहीर
नरसोबाच्या नावाचा उतारा,
अमावस्ये चा चंद्र साक्षीला आहे ......
रात्र हि वैर्याची आहे...............

वेशी कडचे चिंचेचे झाड
रात्री अपरात्री टीवटीवनारी टिटवी,
जंगली कुत्र्याचं आकसून रडण सांगत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............


मैलो अंतराची पाऊल वाट
रस्त्यात लागलेली मसणवाट ,
चिता जाळण्यात मग्न आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

दूर कुठे ओसाड रान
पिकलेल ते उसाचे शेत ,
आज कोल्हयांची गर्दी वाढतच आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

खळ खळ वाहणारा ओढा
अवती भवती पसरलेली शांतता ,
आज ओरडून ओरडून सांगत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

पडलेल्या घराच्या भिंती
हवेने वाजलेली कडी ,
कोणीतरी असल्याचा भास होत आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

मध्यान रात्रीची वेळ
तीच श्वासांची कुजबुज
अजूनही रात्र सरायला वेळ आहे
रात्र हि वैर्याची आहे...............

अंधाराच्या चादरीला पडलेलं चिद्र
एक सूर्य कवडसा आत आला आहे
ह्या पाहते नंतर ती रात्र..... पुन्हा येणार आहे
रात्र हि वैर्याची आहे...............रात्र हि वैर्याची आहे..

कवी : गणेश कदम

Wednesday 7 December 2011

आठवणींचे अश्रू आजही गालावरती ओथंबती.................


आठवणींचे अश्रू आजही गालावरती ओथंबती
परत तिच्या गालावरती खळी उमटली नाही

श्वास श्वास तो गंध गंध तो आधार सावलीचा
दिला हात बाबांनी तिच्या चिमुकल्या बोटांना
...
होता शाळेचा दिवस पहिला
बावरी सावळी घाबरली
बिलगली घट्ट तिच्या बाबांना
म्हणे मी नै जाणार शाळेला

म्हणती बाबा तिजला
बेटा जा तू शाळेला
झेप तुझी साऱ्या जगाला
एके दिनी तू घेशील उंच भरारी
तुझी स्वतःची असेल black ferrari

मी नै तुझा कायमचा सोबती
उद्या तू जाशील गं सासरी
आठवणींची लहरच भारी
विसर तू या बंधनांना
जाग तू आत्मविश्वासाला

भाबडी चिमुकली! तिला सासर म्हणजे,आत्मविश्वास म्हणजे काय काही माहित नव्हतं.
बिचारी रडत रडत शाळेला गेली आणि एक दिवस खूप मोठी झाली.आता तिच्याकडं स्वतःची black ferrari होती.

झाला भाबडीला आनंद मोठा
दाखवायला बाबांना आली घेवून black ferrari

पण घटनाच काही अशी घडली होती.....

झाला होता अपघात मोठा
मनावरती तिच्या आघात केवढाला
पार्थिव पाहुनी बाबांचे अश्रू आवरेना चिमुकलीला

म्हणे ती बाबांना ,
नको मला ती black ferrari
हवी तुमच्या खांद्यावरची सवारी
तुम्ही राजा मी राजकुमारी
घ्याना मला कडेवरती
नन्तर मी निवडते गवारी आवडते तुम्हाला भारी
आपण करू भाजी -पोळी

पण स्मरले तिला ते पहिले शब्द
आठवणींची लहरच भारी
विसर तू बंधनांना
शक्य नव्हते तिजला
पण,घातले श्राद्ध आठवणींना

पण, त्याच
आठवणींचे अश्रू आजही गालावरती ओथंबती
परत तिच्या गालावरती खळी उमटली नाही